Thu, Nov 15, 2018 09:33



होमपेज › Solapur › कायमस्वरूपी पुनर्वसन करावे : प्रकाश आंबेडकर

कायमस्वरूपी पुनर्वसन करावे : प्रकाश आंबेडकर

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 04 2018 10:51PM



मंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

तुटपुंजी मदत जाहीर करून शासनाने आपली जबाबदारी झटकली आहे. असे न होता या समाजाचे  कायस्वरूपी पुर्नवसन होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत भारिप नेते अ‍ॅड. प्रकाश आंबडेकर यांनी व्यक्‍त केले.
धुळे हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या भोसले, माळवे या मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी ते बुधवारी सकाळी खवे येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

 भारिप नेते आंबडेकर पुढे  म्हणाले की, या समाजाची भटकंती थांबण्यासाठी शासनाने लक्ष घातले पाहिजे. यापूर्वी एखाद्या प्रकरणात पोलिस कारवाई होत होती, पण आज लोकच कायदा हातात घेऊ लागले आहेत. भिक्षा मागून पोटाची खळगी भरणार्‍या या पाच मृतांची हत्या करणार्‍याला शिक्षा झाली पाहिजे. भिक्षा मागताना समाज कंटकाकडून होणार्‍या हल्याच्या सरंक्षणासाठी शासनाचे ओळखपत्र मिळाले पाहिजे. धुळे हत्याकांडापूर्वी जी अफवा पसरवली गेली. त्यांच्यावरही पहिल्यांदा कारवाई झाली पाहिजे. कारण त्यांनी जर अफवा पसरवली नसती तर हे हत्याकांड घडले नसते. या समाजाच्या 70 वर्षे चालत असलेला लढ्याचे नेतृत्त्व करण्याची मागणी मच्छिद्र भोसले यांनी केली असता ते म्हणाले की, मी लढत आलो. आताही तुमच्याबरोबर आहे. आता पर्यंत  या घटनेत इथली राजकीय व्यवस्था संवेदनशील आहे. दक्षता घेतलेली आहे. 

यावेळी या समाजाच्या भावना परिस्थितीची जाणीव सुखदेव भोसले यांनी करून दिली. जमात उलेमा इ महाराष्ट्रचे मौलाना  सिद्धिकी यांनी  पाच कुटुंबीयांच्या मुलांना दत्तक घेत पालन पोषणाची जबाबदारी घेत प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये मदतीचे धनादेश सुपूर्द केले. 

यावेळी धनश्री परिवाराचे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी धनश्री परिवाराकडून  अत्याचारग्रस्त पाच कुटुंबाना प्रत्येकी 25 हजारांची रोख मदत प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते दिली. यावेळी  आ. भारत भालके यांच्याकडून विठ्ठलचे संचालक भगीरथ भालके यांनी पाचही कुटुंबाना धान्य व जीवनावश्यक वस्तू दिल्या.  

उपराकार लक्ष्मण माने, उपनराध्यक्ष चंद्रकांत घुले, समाजकल्याण सभापती शिला शिवशरण, नगरसेवक प्रवीण खवतोडे, राहूल सावंजी, दामाजीचे संचालक सचिन शिवशरण, बुवा गायकवाड, धनाजी सरवदे यांच्यासह खवेतील ग्रामस्थ व नातेवाईक यावेळी उपस्थित होते.