Thu, Jul 18, 2019 16:57होमपेज › Solapur › कांदाचोरीप्रश्‍नी ‘जनहित’चे भैय्या देशमुख आक्रमक

कांदाचोरीप्रश्‍नी ‘जनहित’चे भैय्या देशमुख आक्रमक

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 10:13PM

बुकमार्क करा
सोलापूर ः प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीत शेतकर्‍यांचा कांदा नेहमीच चोरीला जात असल्याने जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर ऊर्फ भैय्या देशमुख यांनी शुक्रवारी बाजार समितीत आक्रमक भूमिका घेत हा प्रकार तातडीने रोखण्याची मागणी बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांच्याकडे केली. 

बाजार समितीत शेतकर्‍यांचा शेतीमाल नेहमीच चोरीला जात असतानाही उपाययोजना करण्यात येत नाहीत. त्यामुळे याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करून पोलिस चौकी सुरू करण्यात यावी. बेजबाबदार सुरक्षा यंत्रणा ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

यावेळी समाधान गावडे, धर्मा माळी, दशरथ सलगर, हरिभाऊ लोंढे, बाळासाहेब माळी आदींसह जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.