Mon, May 20, 2019 20:06होमपेज › Solapur › डाळिंब शेतीला लागली घरघर

डाळिंब शेतीला लागली घरघर

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 9:20PM

बुकमार्क करा

निमगांव: वार्ताहर

 राज्यातील दुष्काळी तालुक्यात कमी पाण्यावर येणारे जादा पैसे मिळवून देणारे एकमेव पीक म्हणजे डाळिंब  मानले जात आहे. 

या काटेरी झुडपाने शेतकर्‍यांना लखपती बनवून दारात लक्ष्मी आणली. मात्र, सध्या डाळींब उत्पादक शेतकरी  अर्थिक संकटात सापडला आहे. ज्या डाळिंबाने लाखोंचा धनी बनविले तेच डाळिंब आता शेतकर्‍यांना तोट्यात घालून कर्जबाजारी बनवत आहे. या भागातील बहुतेक शेतकर्‍यांनी मृग हंगामातील बहर घेतला डाळिंब बागा छाटणी केल्यानंतर ऐन बहरच्या वेळेत पाण्याची कमतरता पडली .अशा परिस्थितीत शेततळ्यामुळे शेतकर्‍यांनी बागा जगवल्यानंतर. पाऊस मोठ्या प्रमाणात झाला पाण्याचा  प्रश्‍न मिटला. सततच्या पावसाने फुलगळ मोठ्या प्रमाणात झाल्याने झाडावर फळांची संख्या कमी झाली. या वर्षी लाखो रुपये खर्च करून रासायनिक सेंद्रिय ओषधांची फवरण्या केल्या.  मर, तेल्या डांबर्‍या, कुजवा,  या रोगांनी डाळिंबाची पाठ सोडली नाही. 

अतिपरिश्रम करून ज्या शेतकर्‍यांनी पीक आणले त्यांनी बाजारात पाच  ते तीस रुपये दर मिळू लागला.  तोडणी वाहतूक खर्चात डाळिंब विकू लागले  बागेत तर व्यापारी किलो दराने न मागता ढीगावर मागू लागले. गेल्या वर्षी हाच दर प्रती किलो ऐंशी ते शंभर होता. नोटा बंदीत हाच दर पन्नास ते साठ  रुपये होता. मात्र या वर्षी दरामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरणात निर्माण झाले आहे. काही शेतकर्‍यांनी डाळिंब बागच  उपटून टाकल्या आहेत.  परत जानेवारी- फेब्रुवारी बहर धरण्यासाठी शेतकर्‍या कडे पैसे नाहीत. परत एकदा नशीब आजमावून पाहण्यासाठी कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही अशा दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे.