Tue, Apr 23, 2019 20:19होमपेज › Solapur › सोलापूर : अवैध धंद्यांवर कारवाई; मुद्देमालासह दोघे ताब्यात

सोलापूर : अवैध धंद्यांवर कारवाई; मुद्देमालासह दोघे ताब्यात

Published On: Sep 06 2018 9:23AM | Last Updated: Sep 06 2018 9:23AMसोलापूर : पुढारी ऑनलाईन

पोलीस अधीक्षकांकडे आलेल्या तक्रारीवरुन जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेण्यात आले.  पोलिस अधिक्षकांच्या नवीन विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. यामुळे अवैद्य व्यावसायिकांना मोठी चपराक बसली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्यात आली. वैराग ते बार्शी जाणारे रोडवरील मानेगाव येथे पत्र्याच्या शेडच्या बाजूला चोरून अवैध देशी व विदेशी दारु विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी छापा टाकून आरोपी रावसाहेब कांबळे आणि शिवाजी लोंढे रा.मानेगाव ता.बार्शी यांना ताब्यात घेतले. तसेच विक्रीसाठी ठेवलेला देशी व विदेशी दारुचा एकुण रु.६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात मुंबई प्रोव्हि. ऍक्ट ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील पो नि सुधाकर कोरे, पोसई दीपक दळवी, अमोल तांबे, पो.कॉ. दिघे, कांबळे, मोरे, तळेकर, कदम, गटकूल, पाटिल यांनी कारवाई केली.