Tue, Apr 23, 2019 19:42होमपेज › Solapur › सोलापूर : पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना लाच घेताना अटक 

सोलापूर : पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना लाच घेताना अटक 

Published On: Apr 10 2018 12:42PM | Last Updated: Apr 10 2018 12:42PMसोलापूर : प्रतिनिधी 

पोलिस आयुक्तालयातील अशोक चौक पोलीस चौकी पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव व पोलीस नाईक चव्हाण या दोघांना ८ हजारची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी पोलीस चौकीतच अटक केली.

या प्रकरणातील तक्रारदाराविरुद्ध  दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये कारवाई न करण्यासाठी लाच घेण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या पोलीस चौकीमध्ये गुन्हेगारांना आणून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत होती, त्याच चौकीमध्ये त्याच अधिकाऱ्याला गुन्हेगार म्हणून बसण्याची वेळ आली आहे.