Sat, Feb 23, 2019 09:13होमपेज › Solapur › सोलापूर : पोलिस चौकीतच महिलांची जोरदार हाणामारी

सोलापूर : पोलिस चौकीतच महिलांची जोरदार हाणामारी

Published On: Feb 16 2018 12:02PM | Last Updated: Feb 16 2018 12:02PMसोलापूर : प्रतिनिधी

तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन महिलानी नवी वेस पोलिस चौकीतच पोलिस कर्मचार्‍यांसमक्ष हाणामारी केल्याप्रकरणी दोघींविरुध्द फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

वाचा : सोलापूर : भाड्याने राहणार्‍यांची माहिती पोलिसांना द्यावी

दामिनी दगडू झाडबुके (वय २४, रा. आयटीआय, विजापूर रोड, सोलापूर) आणि श्रृती रोहित कोकणे (वय २४,  रा. शुक्रवार पेठ, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत महिला पोलिस शिपाई रत्ना सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

वाचा : सीना नदी पार करताना महिलेचा बुडून मृत्यू

दामिनी झाडबुके व श्रृती कोकणे यांच्यात वादावादी झाल्याने या दोघीही गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास नवी वेस पोलिस चौकीत एकमेकींविरुध्द तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्या दोघींमध्ये पोलिसांसमक्ष चांगलीच बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसन हाणामारीमध्ये झाले. त्यामुळे याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार जाधव तपास करीत आहेत. 

वाचा : ‘पडक्या वाड्याचा पाटील’ पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत!