Wed, Nov 21, 2018 18:09होमपेज › Solapur › अकलूज शहरातील मटका अड्डयांवर छापा

अकलूज शहरातील मटका अड्डयांवर छापा

Published On: Feb 27 2018 1:26PM | Last Updated: Feb 27 2018 1:26PMसोलापूर : प्रतिनिधी

अकलूज पोलिस ठाणे हद्दीतील मटका अड्डयांवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात ११ जणांसह दोन लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुरेश लक्ष्मण साठे, लालचंद पन्नालाल लकेरी, प्रितेश लालचंद लकेरी, इकबाल सुलतान तांबोळी, सागर पोपट काटे, आकाश अशोक मोरे, दिलावर यासिन शेख, युनूस इब्राहिम शेख (सर्व रा.  अकलूज) अशी अटक केलेल्‍यांची नावे आहेत.  

पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. प्रशांत कुलकर्णी, शकील मुल्ला, महंमद तांबोळी (रा. अकलूज ता .माळशिरस) या बुक्की मालकांवर अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.