होमपेज › Solapur › डॉल्बीमुक्‍त उत्सव झाले तर गुन्हे दाखल होणार नाहीत : तांबडे

डॉल्बीमुक्‍त उत्सव झाले तर गुन्हे दाखल होणार नाहीत : तांबडे

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 8:28PMसोलापूर : प्रतिनिधी

पोलिस जनतेला त्रास देण्यासाठी नाहीत. ते जनतेला सहकार्य व सुरक्षा देण्यासाठी आहेत. डॉल्बीमुक्‍त उत्सव साजरा झाला तर गुन्हे दाखल होणारच नाहीत. त्यामुळे जयंती-उत्सव हे कायद्याच्या चौकटीत राहूनच साजरे करावेत, असे आवाहन पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  जयंती उत्सवानिमित्त सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयामध्ये जयंती मंडळाचे पदाधिकारी, पोलिस अधिकारी व इतर शासकीय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी आयुक्‍त तांबडे बोलत होते. 

यावेळी बैठकीस महापालिका आयुक्‍त अविनाश ढाकणे, उपायुक्‍त अपर्णा गिते, मध्यवर्ती जयंती मंडळाचे अध्यक्ष सत्यजित वाघमोडे आदी उपस्थित होते.
यावेळी उपायुक्‍त गिते यांनी मंडळाच्या पदाधिकार्‍यांना सूचना देऊन सक्‍तीने वर्गणी  न मागण्याचे आवाहन केले. मिरवणुकीवेळी साऊंड सिस्टिमच्या आवाजाचे वारंवार मोजमाप घेतले जाणार असल्याचे सांगितले. मिरवणुकीवेळी दोन बेस व दोन टॉप असे स्पिकर लावण्याबाबतही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्‍त ढाकणे यांनी मिरवणुकीवेळी पाण्याची व्यवस्था व पाणीपुरवठा सुरळीत ठेवला जाणार असून मिरवणुकीवेळी महिलांसाठी फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले. 
या बैठकीस राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, दत्ता वाघमारे, प्रवीण निकाळजे, के.डी. कांबळे, आनंद चंदनशिवे, युवराज पवार, सुबोध वाघमोडे, शांतीकुमार नागटिळक, अ‍ॅड. संजीव सदाफुले, बाळासाहेब वाघमारे, अजित गायकवाड, राजू उबाळे, रवी गायकवाड, सिध्देश्‍वर पंडागळे, नारायण बनसोडे, प्रमोद गायकवाड, सुभान बनसोडे, डी. एन. गायकवाड, अ‍ॅड. स्वप्निल सरवदे, शशीकांत कांबळे आदींनी मनोगत व्यक्त करुन उत्सव चांगल्या पध्दतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव कसा साजरा होईल याकडे लक्ष देण्याबाबत सांगितले. 
यावेळी मनपा अधिकारी अतुल भालेराव, व्ही. बी. चौबे, प्रदूषण महामंडळाचे अधिकारी एस. एम. अवताडे, होमगार्ड कार्यालयाचे घाडगे, परिवहन महामंडळाचे पी. आर. नकाते, सहायक अभियंता परदेशी, उत्पादन शुल्कचे बी. एम. बिराजदार, सहायक अभियंता युसूफ मुजावर, संदीप कारंजे, एमएसईबीचे अधिकारी एस. जहागीरदार, पोलिस अधिकारी, विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.