Sun, May 19, 2019 14:47
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › सोलापूर : पोलिसानेच केला महिला पोलिसाचा विनयभंग

सोलापूर : पोलिसानेच केला महिला पोलिसाचा विनयभंग

Published On: Apr 19 2018 3:38PM | Last Updated: Apr 19 2018 3:38PMसोलापूर : प्रतिनिधी

पोलिस कर्मचार्‍यानेच पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचार्‍याचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस शिपाई अभिजित यल्लादास वामने (ब. नं. 1053, नेमणूक- विजापूर नाका पोलिस ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. याबाबत महिला पोलिस कर्मचार्‍याने फिर्याद दाखल केली आहे. यातील पिडीत महिला पोलिस कर्मचारी ही विजापूर नाका पोलिस ठाण्यातच  कार्यरत असून पोलिस शिपाई  अभिजित  वामने देखील विजापूर  नाका पोलिस  ठाण्यात चालक म्हणून कार्यरत आहे. 

बुधवारी रात्री आठ ते गुरुवारी सकाळी आठ या वेळेत कामावर असताना पिडीत महिला बुधवारी रात्री तिच्या पतीने आणलेला जेवणाचा डबा घेण्यासाठी ठाणे अंमलदार यांच्या रूममधून बाहेर जात होती. त्यावेळी पिडीतेच्या ओळखीचा पोलिस शिपाई अभिजित वामने हा पोलिस ठाण्याच्या पोर्चमध्ये तिच्या समोर येऊन गाणे म्हणू लागला. त्याने दोन्ही हात वर करून पिडीत महिलेच्या अंगावर पडण्याचा प्रयत्न केला व लगट करण्याचाही प्रयत्न केला. 

याप्रकारामुळे पिडीत महिला कर्मचार्‍याने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. याघटनेचा सहायक पोलिस निरीक्षक भोसले अधिक तपास करत आहेत.

Tags : police, Molestation, women police, solapur, vijapurnaka, solapur news