Sat, Jul 20, 2019 13:03होमपेज › Solapur › सोलापूर : विद्यार्थ्याचा खून प्रेम प्रकरणातूनच; आरोपी अटकेत

सोलापूर : विद्यार्थ्याचा खून प्रेम प्रकरणातूनच

Published On: Feb 07 2018 3:38PM | Last Updated: Feb 07 2018 3:38PMनातेपुते : पुढारी ऑनलाईन

माळशिरस तालुक्यातील परळे येथे दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याचा झालेला खून हा प्रेम प्रकरणातून झाल्याची धक्‍कादायक बाब पुढे आली आहे. आज पोलिसांनी दोघा आरोपींना छापा टाकून पकडले. यातील एकजण अल्‍पवयीन आहे. 

पिरळे येथे समता माध्यमिक विद्यालयात संगणक कक्षात दोघा विद्यार्थ्यांनी सहअध्यायी मित्र महेश कारंडे याचा खून केला होता. शाळेत विद्यार्थ्यांनी कोयत्याने वार करून खून केल्याची ही बाब गंभीर होती. त्यामुळे पोलिसांनी रात्रभर फरारी आरोपींचा शोध सुरूच ठेवला. 

वाचा : शाळेच्या वर्गातच विद्यार्थ्याचा खून

आरोपी विश्वजीत बारिकराव यमगर (वय १६) आणि सतीश लोखंडे (वय२१) हे दोघे खून करून फरारी झाले होते. बारामती तालुक्यातील नीरा-वागज येथे यमगर याच्या पाहुण्यांच्या घरात हे दोघे लपून बसले होते. नातेपुते पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. 

प्रेम प्रकरणातून खून

आरोपी विश्वजीत आणि सतीश यांनी खून केल्याचे कबूल केले आहे. तसेच हा खून प्रेम प्रकरणातून केल्याचे त्यांनी सांगितले. 

सतीश लोखंडे तीन वर्षांनी शाळेत

खुनातील आरोपी सतीश लोखंडे हा गेली तीन वर्षे शाळा सोडून घरीच होता. यंदा त्याने दहावीला समत माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला होता. तसेच त्याने बोर्डाचा परीक्षा फॉर्मही भरला आहे.