Wed, Jan 29, 2020 22:17होमपेज › Solapur › आता पंढरपुरात पासपोर्ट केंद्र

आता पंढरपुरात पासपोर्ट केंद्र

Published On: Dec 09 2017 1:47AM | Last Updated: Dec 08 2017 10:29PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर येथे सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा कार्यालयानंतर आता पंढरपूर या ठिकाणीही हे कार्यालय सुरू होणार आहे. विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी आज ही माहिती दिली आहे. पंढरपूर येथे सुरू होणार्‍या केंद्रामुळे परदेशात जाण्यासाठी इच्छुक असणार्‍यांना तत्काळ पासपोर्ट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या मार्चपर्यंत हे केंद्र सुरू केले जाणारआहे. 

देशातील नागरिकांना सुलभ पासपोर्ट सेवा मिळावी या उद्देशाने नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या मार्च 2018 पर्यंत देशात 251 केंद्रे सुरू होणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात 20 पासपोर्ट केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील 4 पासपोर्ट केंद्रे सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर व पिंपरी-चिंचवड येथे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित 16 पासपोर्ट केंद्रे लवकरच कार्यान्वित होतील, अशी माहिती ज्ञानेश्‍वर मुळे यांनी दिली आहे. मार्च 2018 पर्यंत देशात 251 नवीन पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू होणार असून महाराष्ट्रात 16 केंद्रे लवकरच सुरू करण्यात येतील, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी दिली आहे.