Thu, Nov 15, 2018 09:47



होमपेज › Solapur › परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यात टाकी फुटली

परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यात टाकी फुटली

Published On: Dec 09 2017 1:47AM | Last Updated: Dec 08 2017 10:27PM

बुकमार्क करा





परळी वैजनाथ : प्रतिनिधी

येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उत्पादन विभागात ज्युस सेक्शनमध्ये शुक्रवारी दुपारी 2.30 वा. सुमारास टाकी फुटून अपघात घडला आहे. यामध्ये गरम रसमिश्रित पाणी पडून 11 जण भाजले असून, जळीत कामगारांना तातडीने परळीत प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई व लातूर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. 

वैद्यनाथ साखर कारखान्यातील उत्पादन विभागात ज्युस सेक्शनमध्ये असलेल्या उसाचा रस व पाणी उकळून वेगळे करणार्‍या टाक्यांपैकी एक टाकी अचानक फुटली. यामुळे घडलेल्या दुर्घटनेत या टाकीखाली काम करत असलेल्या तांत्रिक विभाग व कामगार अशा जवळपास 11 जणांच्या अंगावर हे गरम रसमिश्रित पाणी पडले. यामध्ये हे कामगार भाजले आहेत. भाजलेल्या कर्मचार्‍यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

भाजलेल्या कर्मचार्‍यांत अभियंता धनाजी देशमुख, लहू डाके, सुनील भंडारे, सुमित भंडारे, आदनाक, संघापुडे हनुमंत, गौतम घुमरे, महादेव मुंडे आदींचा समावेश आहे. दरम्यान, यातील जळीत रुग्णांवर परळी येथे प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई येथे पुढील  उपचारासाठी हलवण्यात आले आहे.