Sun, Apr 21, 2019 05:49होमपेज › Solapur › अन्यायग्रस्त शिक्षकांच्या बदल्या सोयीच्या करा

अन्यायग्रस्त शिक्षकांच्या बदल्या सोयीच्या करा

Published On: Aug 04 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 10:43PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अन्याय झालेल्या  शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री  विजयकुमार देशमुख यांच्यासोबत बैठक घेऊन झालेल्या चुका तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात, अशी सूचना  ग्रामीण विकासमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना दूरध्वनीद्वारे केली.

सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले, चेअरमन वीरभद्र यादवाड, दक्षिण संघाचे अध्यक्ष सूर्यकांत हत्तुरे-डोगे यांनी  पालकमंत्री ना. विजयकुमार देशमुख यांच्या मध्यस्थीने ना. मुंडे यांच्याशी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात भेट घेऊन निवेदन दिले. 

यावेळी काशीनाथ विजापुरे, शाहू पवार, प्रवीण घोडके, धनराज थिटे आदी अन्यायग्रस्त शिक्षक उपस्थित होते. ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव असिम गुप्ता यांनाही भेटून निवेदन दिले. तेव्हा गुप्ता यांनी 6 तारखेपर्यंत याविषयी अहवाल मागवून विषय निकाली काढण्याची हमी दिली.

या चर्चेत शिक्षकांच्या बदल्यांमध्ये विषय शिक्षकांना रँडम राऊंडअपमध्ये अन्याय झालेल्या शिक्षकांना व पती-पत्नी शिक्षक विलग झाले असतील तर अशांना जवळ आणण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालकमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन न्याय द्यावा, अशी सूचना मुंडे यांनी डॉ. भारुड यांना दूरध्वनीवरुन केली.