होमपेज › Solapur › 45 दिवसात 78 हजार हात राबले पाणी फाऊंडेशन तालुक्यात रुजले

45 दिवसात 78 हजार हात राबले पाणी फाऊंडेशन तालुक्यात रुजले

Published On: May 29 2018 1:27AM | Last Updated: May 28 2018 10:35PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यात  पाणी फौऊडेशनचे काम अतिशय चांगले सुरु असून या स्पर्धच्या सहभागी दहा गावातून  45 दिवसात तब्बल 78 हजार लोकांनी श्रमदानात सहभाग घेतला. यात 4 वर्षाच्या चिमुकल्यापासून 80 वर्षाच्या वृद्धांच्या हाताचे यश आहे. यामुळे भविष्यात एक मेकांच्या मदतीने किती मोठे काम होऊ शकते याचा प्रत्यय येत आहे. यात  यंत्र व माणसाच्या सहायाने 15 लाख 25 हजार घनमीटर काम झाले आहे. 

 दि. 8  एप्रिल  ते  22 मे  दरम्यान  या कालावधी पाणी फाऊंडेशनच्यावतीने वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  पाणी अडवून जिरवण्यासाठी वाटर कप स्पर्धेत लोकांचा सहभाग पाहून आर्थिक मदत केली. शासनाने या योजेनला देण्यात येणारे अनुदान वाढवावे जेणे करुन सामूहीकरित्या केले जाणारे हे काम अधिक प्रभावी होईल. संत चोखोमेळा नगर लवंगी, निंबोणी, मारोळी या गावात 2140 तास जेसीबी व पोकलेन यंत्राच्या सहयाने 15 लाख घनमीटरचे काम केले. तर श्रमदानातून कंपार्टमेंट बांध, शेततळे, रोपवाटीका, शोषखड्डे, ओढा खोलीकरण, एल.बी.एस माती नाला, बांध, कंटोल बांधही कामे खुपसंगी, आसवेवाडी, शिरसी, डोंगरगाव कचरेवाडी लेंडवे चिंचाळे येथे ही कामे झाली. तर श्रमदानातून 25 हजार घनमीटरचे काम करण्यात आले.या कामाला भारतीय जैन संघटनेच्या वतीने 7 पोकलेन व 8 जे.सी.बी 45 दिवस उपलब्ध करुन दिले. याशिवाय जे.एम.म्हात्रे कन्स्ट्रक्शन यांनी आसबेवाडीला पाच लाख रु,अस्तित्व संस्था सांगोला यांनी लेंडवे चिंचाळे या गावात 25 तास जे.सी.बी उपलब्ध करुन दिले. सी.पी.बागल अ‍ॅन्ड कंपनी यांनी खुपसंगी व आसबेवाडीत पोकलेन उपलब्ध करुन दिले.आ. भारत भालके, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनीही मदत केली. याशिवाय वारी परिवार, स्वेरी पंढरपूर, दामाजी महाविदयालय कर्मचारी, राष्ट्रवादी कॉग्रेस, पत्रकार संघ, भैरवनाथ शुगर लवंगी, रतनचंद शहा बॅक मंगळवेढा यांच्या बरोबर पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख, जैन संघटनेचे राहूल शहा, मास्टर टेनर अ‍ॅड रविद्र पोपणे, पवन वाळुंज, नाथा भाऊ वसीम शेख, वैभव इंगळे, जितेंद्र गडहिरे, प्रल्हाद वाघ यांच्यासह रत्नागिरी कोल्हापूर, टेभूर्णी, मुंबई, सोलापूर येथील विविध संस्था व जलमित्रांनी सहभाग घेतला.

 या स्पर्धेसाठी सुरुवातीला 54 गावे निश्‍चितसाठी झाली होती. यामध्ये 35 गावे पात्र ठरली प्रशिक्षातून निवडलेल्या गावात या योजनेचे काम करावयाचे होते. पण प्रत्यक्षात  17 गावांनी काम सुरु केले पण 10 गावांनी यात सातत्य ठेवले10 गावात चांगले काम झाले.  हे काम तीन वर्षे चालणार असल्याने अन्य गावाचा सहभाग महत्त्वाचा असून सर्वच गावे सहभागी झाली तर दुष्काळी मुक्ती शक्य होणार आहे.