Wed, Jan 29, 2020 23:42होमपेज › Solapur › शेतकर्‍यांची २३०० रुपयांवर बोळवण

शेतकर्‍यांची २३०० रुपयांवर बोळवण

Published On: Dec 08 2017 1:43AM | Last Updated: Dec 07 2017 9:22PM

बुकमार्क करा

पानीव : विनोद बाबर

भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि रयत क्रांती संघटना, स्वाभिमानीमध्ये झालेल्या बोलणीनुसार एफ.आर.पी.अधिक 400 रुपये देण्याचा काढलेला तोडगा तोकडाच ठरला असून, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकर्‍यांच्या हातावर 2250 ते 2300 रुपये टेकवले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांचे आंदोलन फार्स ठरले असून, साखर कारखानदारांच्या अभेद्य एकीपुढे शेतकरी संघटनांनी सपशेल माघार घेतल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकर्‍यांतून व्यक्‍त होत आहेत.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलन पेटले होते. सर्वच शेतकरी संघटनांसोबत शेतकरी रस्त्यावर उतरले होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल कारखान्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रयत क्रांती संघटनेने बोलणी केली. एफ.आर.पी. अधिक 400 रुपये असा तोडगा मान्य करून शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. त्यानंतरही हा तोडगा मान्य नाही म्हणून बळीराजा शेतकरी संघटना, प्रहार संघटना, जनहित शेतकरी संघटना लढत असल्या तरी आंदोलन पूर्णपणे थंडावले आहे.