Thu, Jun 27, 2019 17:46होमपेज › Solapur › टिपरच्या धडकेत युवक ठार

टिपरच्या धडकेत युवक ठार

Published On: Aug 26 2018 10:29PM | Last Updated: Aug 26 2018 10:08PMपंढरपूर : प्रतिनिधी

 येथील सांगोला रोडवर असलेल्या वीज वितरण कंपनीसमोर  पंढरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्‍या टिपरने दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना रविवारी दुपारी 12 वा. घडली आहे. दिनकर भास्कर गायकवाड (वय 28) रा. फुलचिंचोली (ता.पंढरपूर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 फुलचिंचोली येथील दिनकर गायकवाड हे पंढरपूरहून कासेगावकडे कामानिमित्त दुचाकीवरून निघाले होते. तर सांगोलाहून पंढरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने विटा भरून आलेल्या  टिपरने एमएसईबी बोर्डाजवळ दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार दिनकर गायकवाड याच्या डोक्यावरून टिपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत टिपर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास एएसआय चव्हाण करत आहेत.