Sun, Jan 19, 2020 21:07होमपेज › Solapur › ‘विजय शुगर्स’च्या लिलावास उच्च न्यायालयाकडून स्थगिती

‘विजय शुगर्स’च्या लिलावास उच्च न्यायालयाकडून स्थगिती

Published On: Dec 19 2017 2:06AM | Last Updated: Dec 18 2017 9:33PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी 

करकंब (ता.पंढरपूर) येथील विजय शुगर्स साखर कारखान्याने बँक व शेतकर्‍यांची देणी थकवल्याने कारखान्याचा लिलाव काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती परंतु जिल्हा बँकेने उच्च न्यायालयात मूलभूत अधिकारावर गदा येत असल्याची याचिका दाखल केल्याने हायकोर्टाने लिलाव प्रक्रीया पतात्पुरती स्थगिती केली आहे. त्यामुळे सोमवारी विजय शुगर्सचा लिलाव होऊ शकला नाही.

करकंब (ता.पंढरपूर) खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मालकीचा विजय शुगर्स हा कारखाना उभारणीस सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक(डीसीसी), बँक ऑफ महाराष्ट्र मुंबई,  सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक शाखा अकलूज, विक्रीकर, उपआयुक्त व्हॅट ई.002 कार्यालय सोलापूर, अना. बिनशेती वसुली सन 2015- 2018 यांचेकडील एकूण रक्कम 507 कोटी 73 लाख 39 हजार 556 रुपये इतकी थकबाकी असल्याने थकबाकी पोटी अखेर कारखान्याचा लिलाव काढण्यात आला आहे.

सोमवार (दि. 18 रोजी) याबाबत तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी  सकाळी 11 वाजलेपासून  लिलाव प्रक्रियेस सुरुवात केली. या लिलाव प्रक्रियेत तीन जणांनी  अर्ज  सादर केले. मात्र यातील बबनराव शिंदे  शुगर्स व विठ्ठल एंटरप्राजेस प्रा.लि. टेंभुर्णी-शहाजी गिराम यांनी सहभाग नोंदविला. मात्र दुपारी 1.10 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लिलावास स्थगिती देण्यात आल्याची माहिती तहसीलदार बर्गे यांच्याकडे आल्याने त्यांनी लिलावाची प्रक्रिया बंद केली.

मुंबई हायकोर्टात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने  साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, राज्यशासन, विजय शुगर्स यांच्या विरोधशत रिपीटीशन (क्र.13842/17) दाखल केल्याने लिलाव प्रकियेस हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.  यामुळे सोमवारी विजय शुगर्सची लिलाव प्रक्रिया थांबवण्यात आली.