Wed, Sep 19, 2018 20:29होमपेज › Solapur › माळीनगर येथे चौरंगीनाथाच्या पालखीचे रिंगण उत्साहात(व्हिडिओ) 

माळीनगर येथे चौरंगीनाथाच्या पालखीचे रिंगण उत्साहात(व्हिडिओ)

Published On: Jul 15 2018 8:23PM | Last Updated: Jul 15 2018 8:13PMमाळीनगर (जि. सोलापूर) : गोपाळ लावंड सालाबादप्रमाणे केडगाव चौफुला (जि . पुणे ) येथून विठुरायाच्या भेटीसाठी निघालेली संत चौरंगीनाथाची पालखी रविवार  दि १५ जुलै रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहाने माळीनगर नगरीत दाखल झाली. 

माळीनगर परिसरात पालखी सोहळ्याचे स्वागत सासवड माळी शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे यांच्या हस्ते झाले. पुढे ग्रामपंचायत माळीनगरच्या वतीने  सरपंच अभिमान जगताप, उपसरपंच सारिका एकतपुरे, यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यानंतर पालखीचे मॉडेल हायस्कूल माळीनगरच्या प्रशस्त मैदानावर गोल रिंगण हरीनामाच्या गजराने संपन्न झाले. त्‍यानंतर सासवड माळी शुगर फॅक्टरीचे संचालक मोहनराव लांडे यांच्या हस्ते पादुकांची विधीवत पूजन करून आरती करण्यात आली.  

मॉडेल हायस्कूल माळीनगरच्या प्रशस्त मैदानावर रिंगण पाहण्यासाठी भक्‍तांनी गर्दी केली होती.