होमपेज › Solapur › बोंडले येथे पोलिसांकडून वाहतूकीचे योग्‍य नियाजन

बोंडले येथे पोलिसांकडून वाहतूकीचे योग्‍य नियाजन

Published On: Jul 20 2018 10:46AM | Last Updated: Jul 20 2018 10:46AMबोंडले : प्रतिनिधी

गुरूवारपासून बोंडले येथे संत सोपानकाकांची पालखी मुक्कामी आहे. आज (दि. २०)दुपारी १२ वाजता संत ज्ञानेश्र्वर महाराज यांचा पालखी सोहळा ठाकुरबुवा समाधी येतील रिंगन सोहळा उरकून तोंडले या ठिकाणी विसावणार आहे तर, आाज दुपारी १२ वाजता संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बोंडले चौकात विसावणार आहे.

बोंडले येथे या तीन पालख्यांचा संगम होत आहे, तसेच अनेक छोट्यामोठ्या पालख्या या ठिकाणी येत असल्यामुळे बोंडले या गावातून लाखो वारकरी मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यामुळे या ठिकाणी पोलिस प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. परंतु बोंडले येथे पोलिसांनी योग्य नियोजन केले आहे. श्रीपुरकडून येणार्‍या संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील व वेळापूरकडून येणार्‍या संत ज्ञानेश्र्वर महाराज पालखी सोहळ्यातील वाहने व वारकरी टप्पाटप्प्याने सोडण्यात येत आहेत.