Fri, Apr 26, 2019 15:19होमपेज › Solapur › एसटीच्या धडकेत दोघे ठार

एसटीच्या धडकेत दोघे ठार

Published On: Feb 09 2018 10:55PM | Last Updated: Feb 09 2018 10:19PMपंढरपूर : प्रतिनिधी 

पंढरपूर येथील गवळी समाजाच्या यात्रेकरिता सोलापूरहून निघालेले 2 युवक राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या धडकेत सुस्ते (ता. पंढरपूर) येथे ठार झाले. संतोष श्याम भास्कर  (वय 27) आणि ऋषिकेश ज्योतीराम संकपाळ (वय 26, रा. सय्यदवरवडे, ता. मोहोळ) अशी मृतांची नावे आहेत.

पंढरपूर येथे गवळी समाजाची पारंपरिक यात्रा शुक्रवारी होती. या यात्रेसाठी सोलापूरहून मोटारसायकलवरून पंढरपूरकडे हे दोघे निघाले होते. सुस्ते-तारापूर नाला येथे आल्यानंतर त्यांनी पेट्रोल पंपावर मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरले आणि पंपावरून बाहेर येऊन पंढरपूरकडे निघाले असता समोरून येणारी एसटी बसची मोटारसायकलला धडक लागली. यामध्ये एक युवक जागीच ठार झाला, तर दुसर्‍या युवकाचा उपचारासाठी पंढरपूरकडे नेत असताना मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.