Tue, Nov 20, 2018 11:06होमपेज › Solapur › पंढरपूर मंदिर समिती कायद्यात सुधारणा

पंढरपूर मंदिर समिती कायद्यात सुधारणा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : वारकरी समाजाच्या आंदोलनानंतर सरकारने पंढरपूर मंदिर समितीच्या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंदिर  समितीवर सहअध्यक्षांची नियुक्ती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासंबंधीचे विधेयक हे विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.

पंढरपूर मंदिर समितीच्या रचनेनंतर त्याला वारकरी समाजाने विरोध केला होता. त्यांनी आंदोलन करून मंदिर समितीच्या बरखास्तीची मागणी केली होती.त्याचप्रमाणे मंदिर समिती स्थापन करताना वारकर्‍यांना डावलल्याची भावना व्यक्‍त केली होती.  त्यानंतर वारकर्‍यांना मंदिर समितीत योग्य ते स्थान देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल असे आश्‍वासन सरकारने दिले होते. त्यानुसार मंदिर समितीवर आता अध्यक्षांच्या जोडीला सहअध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही सुधारणा सुचविणारे हे विधेयक आहे.