Mon, Jun 24, 2019 21:45



होमपेज › Solapur › तहसील आवारातच आत्मदहनाचा प्रयत्न

तहसील आवारातच आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Apr 16 2018 10:57PM | Last Updated: Apr 16 2018 10:44PM



पंढरपूर : प्रतिनिधी

करकंबचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसलेले लोक गुन्हेगारी स्वरूपाचे असून त्यांच्यावर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करीत करकंब येथील  अलीम पठाण याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. सोमवारी (दि. 16) भरदुपारी येथील तहसील आवारात घडलेल्या या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला.

अलीम रतिलाल पठाण (रा.करकंब) असे पेटवून घेतलेल्या व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून करकंबचे वादग्रस्त सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील सातत्याने  हे मनमानी कारभार करून सर्वसामान्यांना वेठीस धरतात, त्रास देण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करतात, अवैध धंद्यांना अभय देतात, असे आरोप करीत त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी दादासाहेब चव्हाण (रा. पटवर्धन कुरोली) यांच्यासह पोपट कडलासकर (देवडे), महंमद पठाण (पेहे), अतुल भोसले आदींनी मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमिवर नुकतीच दीपक पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. 

सोमवारी करकंब येथील अलीम पठाण यांच्यासह कांही लोक गंभीर गुन्हे दाखल असलेले लोकच मुंबईत जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या विरोधात उपोषणास बसले असून त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करीत अलीम पठाण यांनी दुपारी 2.20 वाजण्याच्या सुमारास चक्क तहसील आवारात येऊन अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले.अंगावर ओतलेल्या रॉकेलने पेट घेतल्यानंतर भडका उडाला. त्यात भाजून अलीम पठाण याचा चेहरा, छाती आणि पोटावर मोठ्या जखमी झाल्या. जखमी पठाण यास वाहनातून पठाण यांना उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविले.