Wed, Mar 20, 2019 12:46होमपेज › Solapur › सहकारशिरोमणी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

सहकारशिरोमणी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

Published On: Dec 22 2017 1:30AM | Last Updated: Dec 21 2017 8:44PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी 

वसंतदादा काळे साहित्यकृती पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृती पाठवाव्यात, असे आवाहन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी केले. 

सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या जयंतीनिमित्त वसंतदादा काळे प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणार्‍या विविध पुरस्कारांच्या निवड समितीची बैठक ज्येष्ट साहित्यिक डॉ. द.ता. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संध्याकाळी झाली. यावेळी कल्याणराव काळे, सिद्धार्थ ढवळे, बाळासाहेब काळे, शिवाजीराव बागल, भाऊ साहेब जगताप, सुधाकर कवडे उपस्थित होते.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या जयंतीनिमित्त फेब्रुवारी  2018 मध्ये विशेष मान्यवरांच्या हस्ते वसंतदादा काळे प्रतिष्ठानच्यावतीने महाराष्ट्रातील सामाजिक, कृषी, शैक्षणिक, उत्कृष्ठ साहित्यकृती  इ. क्षेत्रातील उल्लेखनीय कामकाज करणार्‍या व्यक्तींना रु 10,000 रोख, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन पुरस्कारप्राप्त व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे.साहित्यकृती पुरस्करांव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव न मागवता निवड समितीच्यावतीने संबंधित व्यक्तीच्या कार्याची माहिती घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड केली जात असल्याने या पुरस्काराला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.