Tue, Nov 20, 2018 17:33होमपेज › Solapur › पंढरपुरात रेल्वेखाली सापडून तरुण ठार

पंढरपुरात रेल्वेखाली सापडून तरुण ठार

Published On: Mar 07 2018 11:19PM | Last Updated: Mar 07 2018 10:54PMपंढरपूर : प्रतिनिधी शहरातील स्टेशन रोडवरील तालुका पोलिस स्टेशनजवळीत रेल्वे पुलावर रेल्वेला धडकून तरुण जागीच ठार झाल्याची घटना बुधवार, दि. 7 रोजी सायं.6 वा. घडली आहे. उल्हास कुलकर्णी (वय 35, रा. वृंदावननगर, पंढरपूर) असे ठार झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. बुधवारी सायं. 6 वाजता पंढरपूर -कुर्डुवाडी रेल्वे निघाली असता, रेल्वे पुलाजवळ आली असता येथून पायी चाललेल्या उल्हास कुलकर्णी यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुख्य रस्त्यालगत घटना घडल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.