होमपेज › Solapur › राजकीय नेत्यांची आज मांदियाळी

राजकीय नेत्यांची आज मांदियाळी

Published On: Feb 16 2018 10:39PM | Last Updated: Feb 16 2018 8:44PMपंढरपूर : प्रतिनिधी

सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या 74 व्या जयंतीनिमित्त आयोजित  पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त वाडीकुरोली येथे राजकीय नेत्यांची मांदियाळी जमणार आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार, काँग्रेस, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या या मेळाव्याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

स.शि. वसंतराव काळे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील कृषी, शैक्षणिक, सामाजिक आणि  साहित्यिक  क्षेत्रातील मान्यवरांना  वसंतदादा  काळे पुरस्काराने गौरविण्यात येते.   आज (17 फेब्रु. रोजी) सकाळी 10 वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या  उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. 

कार्यक्रमास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. मधुकर चव्हाण, आ. गणपतराव देशमुख, आ. दिलीप  सोपल, आ. सिध्दराम म्हेत्रे, आ. भारत भालके, आ. बबनराव शिंदे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. रामहरी रुपनवर, आ. हणमंतराव डोळस, आ. दत्तात्रय  सावंत, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी आमदार दिलीप माने, राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, बळीराम साठे, माजी आ. विनायक पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, बाळासाहेब शेळके, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. वाडीकुरोली (ता. पंढरपूर)  येथील वसंतदादा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या पटांगणात भव्य सभामंडप उभारण्यात आला असून लगतच्या पटांगणावर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.