Sat, Sep 22, 2018 22:15होमपेज › Solapur › पंढरपूर : विवाहितेचा खून

पंढरपूर : विवाहितेचा खून

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील तरुण विवाहितेचा तिच्या पतीनेच लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. दरम्यान, या घटनेतील पती पसार झाला असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. 

याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांत राजाराम श्रीमंत अटकळे (रा. शेगाव दु.) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 25 नोव्हेंबर रात्री 10 वाजल्यानंतर ते 26 नोव्हेंबर सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान गोपाळपूर येथील संशयित आरोपी अण्णासाहेब औदुंबर आसबे याने आपली पत्नी सौ. ऐश्‍वर्या अण्णासाहेब आसबे (वय 21) हिच्या सोबत घरगुती कारणावरून भांडण काढले आणि लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण करून तिचा खून केला. सकाळी आरोपी अण्णासाहेब आसबे याच्या घराशेजारीच  ऐश्‍वर्याचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, या घटनेतील संशयित आरोपी अण्णासाहेब आसबे पसार झाला असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.