Thu, Sep 21, 2017 23:17
30°C
  Breaking News  

होमपेज › Solapur › पंढरीत विवाहितेची विष प्राशन करुन आत्महत्या 

पंढरीत विवाहितेची विष प्राशन करुन आत्महत्या 

Published On: Jul 17 2017 3:23PM | Last Updated: Jul 17 2017 3:23PM

बुकमार्क करा


पंढरपूर : पुढारी ऑनलाइन 

वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या सहकारी डॉक्टरच्या एकतर्फी प्रेमाला आणि सासरी पतीकडून चारित्र्यावर संशय घेतल्याने होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने आत्‍महत्‍या केली आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांनी एकतर्फी प्रेम करणाऱ्या डॉ. विरेशकुमार जालानी आणि विवाहितेचा पती बापू पाखरे या दोघांना  अटक केली आहे. 

सौ. पुजा बापुराव पाखरे ( वय २४ रा, हरीनयन पार्क पंढरपूर ) हिने विष प्राशन करुन आत्महत्या केली. 

सुत्रानीं दिलेल्या माहितीनुसार, पुजा पाखरे ही सोलापुरच्या गांधीनाथा होमिओपॅथी महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होती. २०१२ साली पुजाचा विवाह बापु पाखरे यांचासोबत झाला होता. विवाहानंतरदेखील पुजा आपले वैद्यकीय शिक्षण घेत होती. दरम्यान, तिच्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या विरेशकुमार जालानीने पुजाला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तो पुजाला वारंवार फोन करुन धमकी देत असे. विरेशकुमारचे पुजावर एकतर्फी प्रेम होते. पुजा विरेशकुमारच्या त्रासाला वैतागली होती. पुजाने ही गोष्ट माहेर आणि सासरच्या मंडळींना सांगितली. 

रविवारी पुजा आपल्या पती, आई, वडील यांच्यासह सोलापूरला विरेशकुमारला समजावून सांगण्यासाठी गेली होती. मात्र, मानसिक त्रास असह्य झाल्याने पुजाने घरी आल्यानंतर विष प्राशन करुन आत्महत्या केली. पुजाचा पती हासुद्धा पुजाच्या चारित्र्यावर संशय घेत होता असा आरोप पुजाच्या वडिलांनी केला आहे. पुजाने लिहिलेली चिठ्ठी आणि वडिलांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात सुरु आहे. मयत पुजाचा पती बापु पाखरे आणि डॉक्टर विरेशकुमार जालानीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.