Tue, Jul 23, 2019 02:28होमपेज › Solapur › वाखरीत आंदोलनातचं संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी(Video) 

वाखरीत आंदोलनातचं संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी(Video) 

Published On: Aug 09 2018 6:20PM | Last Updated: Aug 09 2018 6:20PMपंढरपूर : प्रतिनिधी

गुरूवार दि 9 ऑगस्ट रोजी राज्यभर पुकारण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनात वाखरीकरांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. यावेळी संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी याच आंदोलनात साजरी करून आंदोलन सार्थकी लावले.

आज ( दि. 9 ऑगस्ट ) रोजी संत शिरोमणी नामदेव महाराजांची पुण्यतिथी असल्याचे भान राखून वाखरीच्या आंदोलन स्थळीच संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुष्पहार घालून तिथेच वाखरी येथील ह.भ.प. भागवत पोरे, गंगाधर गायकवाड यांच्यासह भजनी मंडळाने टाळ, मृदंगाच्या गजरात सुमारे दिड तास भजन केले. विविध अभंग गायन करण्यात आले. यावेळी ह.भ.प. पांडूरंग पोरे महाराज यांनी  अरे अरे शासना, तुला जाग का येईना, मराठ्यांना आरक्षण का देईना अशा शब्दात मराठा समाजाच्या आरक्षणाची व्यथा सादर केली. उन्हाचा तडाखा असतानाही शेकडो ग्रामस्थ या भजनात दंग होऊन गेले होते.

त्यानंतर दुपारी साडे बारा वाजता पुण्यतिथीनिमित्त संत नामेदव महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित आंदोलकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संतांच्या मार्गावरील गाव असल्याने वाखरीकरांनी आंदोलन करीत असतानाही संतांच्या विचारांची आठवण जपल्याचे दिसून आले.