Mon, Jun 24, 2019 16:39होमपेज › Solapur › महामार्गाच्या फेर सर्व्हेसाठी शेतकरी आज खा. पवारांना घालणार साकडे

महामार्गाच्या फेर सर्व्हेसाठी शेतकरी आज खा. पवारांना घालणार साकडे

Published On: Feb 16 2018 10:39PM | Last Updated: Feb 16 2018 8:38PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या मध्य रेषेवरून दोन्ही बाजूंना समान भूसंपादन करण्यात यावे तसेच यापूर्वी करण्यात आलेला सर्व्हे रद्द करून नव्याने सर्व्हे करण्यात यावा. त्याकरिता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केंद्रीय सडक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रयत्न करावेत, असे शेतकर्‍यांच्यावतीने पवारांना आज साकडे घातले जाणार आहे.  

यासंदर्भात  शुक्रवारी (16 रोजी) भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे शेतकर्‍यांची बैठक झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गासाठी विशेष प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे त्यांकडेच या महामार्गामुळे बाधित होणार्‍या शेतकर्‍यांचे गार्‍हाणे मांडले जावे, असा सूर शेतकर्‍यांतून उमटला आहे. खा. पवार यांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि शेतकर्‍यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नितीन गडकरी यांच्याकडे राष्ट्रीय महामार्गाचा फेर सर्व्हे करण्यात यावा. रस्त्याचा आराखडा मूळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी समान भूसंपादन करून तयार करण्यात यावा, अशाप्रकारची मागणी शेतकरी करीत आहेत. यासंदर्भात आज (शनिवारी) शेतकर्‍यांचे प्रतिनिधी खा. पवारांना भेटून त्यांना यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून साकडे घालणार आहेत.