होमपेज › Solapur › विठ्ठल दर्शन रांगेत महिला भाविकाचा मृत्यू

विठ्ठल दर्शन रांगेत महिला भाविकाचा मृत्यू

Published On: Jan 10 2018 5:58PM | Last Updated: Jan 10 2018 5:58PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

विठ्ठल दर्शन घेण्यासाठी रांगेत असलेल्या वयोवृद्ध महिला भविकाचा रांगेत हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. साखराबाई सखाराम जिरजे, ( वय 78, रा भोसेवाडी, पैठण, जि औरंगाबाद ) असे त्या महिलेचे नाव आहे.

विठ्ठल दर्शनासाठी संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपात असलेल्या साखराबाई यांना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हृदविकाराचा तिव्र धक्का बसला. या मध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. दर्शन मंडपात तैनात असलेल्या डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, त्या मयत झाल्याचे सांगितले.