पंढरपूर :
आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरीतील सुप्रसिध्द सलून कलाकार माऊली चव्हाण यांनी मोठ्या कल्पकतेने सावळ्या विठुरायाचं स्वयंभू रूप केसरचनेत साकारलंय. माऊली चव्हाण यांनी मोठ्या कलात्मकतेने एका व्यक्तीच्या डोक्यावरील केससंभारात विठ्ठलाचं रूप कोरलं आहे. यापूर्वी माऊली चव्हाण यांनीही आपल्या कलेद्वारे पक्षीसंवर्धनाचा संदेश देण्याचे स्तुत्य कार्य केले आहे. माऊली चव्हाण यांचे लई भारी फे्रेंडशीप जेन्टस् पार्लर हे केशकर्तनालयाचे दुकान पंढरीतील दाळे गल्ली येथे आहे. आपल्या हातातील कैची वस्तर्याच्या द्वारे त्यांनी कलेचे अनेक उत्कृष्ट नमुने याआधीही दाखवुन दिले आहेत. त्यांच्या या कलेद्वारे सादर केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे पंढरपूर शहर व तालुक्यातून सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे. अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिभावंत व्यक्तींनी माऊली चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व दूरध्वनीद्वारे कौतुक करून त्यांच्या कलेला दाद दिली आहे.