होमपेज › Solapur › मंदिर समितीच्या त्या दोन्ही कर्मचार्‍यांवर कारवाई

मंदिर समितीच्या त्या दोन्ही कर्मचार्‍यांवर कारवाई

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

शुक्रवारी (दि.24) मंदिरे समितीच्या दोन पुजार्‍यांमध्ये वाद झाला; परंतु रुक्मिणी मातेच्या नैवेद्यास उशीर झाला नसल्याचा खुलासा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी केला आहे. दरम्यान, ज्या कर्मचार्‍यांच्या वादामुळे मंदिर समितीच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्यामुळे गैरवर्तनाबद्दल दोन्ही कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आल्याचेही तेली यांनी पत्रकात म्हटले आहे. 

24  नोव्हेंबर रोजीच्या मंदिर समितीच्या सुनील गुरव आणि गणेश ताठे या दोन कर्मचार्‍यांमध्ये मंदिरात वाद झाला होता. त्यामुळे देवीच्या नैवेद्यास उशीर झाल्याचे वृत्त सर्व वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते; मात्र त्या दिवशीच्या उपलब्ध सी.सी.टी.व्ही. फुटेजनुसार रुक्मिणी मातेचा नैवेद्य सकाळी 10.48 ते 11.16 या दरम्यान दैनंदिन वेळापत्रकानुसार झाला आहे, असे तेली यांनी म्हटले आहे.