Fri, Jul 19, 2019 07:37होमपेज › Solapur › श्रीकांत पाडुळे यांची पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती

श्रीकांत पाडुळे यांची पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती

Published On: Apr 24 2018 4:23PM | Last Updated: Apr 24 2018 4:23PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक पदी सोलापूर येथील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी पाडुळे यांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे. दरम्यान पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांचा कार्यकाळ आणखी काही महिन्यांचा असल्यामुळे त्यांच्या सोबतच पाडुळे यांचीही अतिरिक्त पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक असल्याचे बोलले जाते. विठ्ठल दबडे यांची बदली होणार असल्याचे अद्याप तरी स्पष्ट नसल्यामुळे पाडुळे यांच्या रूपाने शहर पोलीस ठाण्यात आणखी एका पोलीस निरीक्षकाची नेमणूक झाली आहे. श्रीकांत पाडुळे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्यामुळे विठ्ठल दबडे यांची बदली होईपर्यंत पदावनती झाल्याचे मानले जात आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून पंढरपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली होती. विठ्ठल दबडे याना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात  अपयश आल्यामुळे त्यांच्या बदलीची शक्यता व्यक्त होत होती. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पंढरपूर पोलीस मजबूत करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार पाडुळे यांची नेमणूक असल्याचे दिसून येते. 8 दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांनी पंढरपूर शहर आणि ग्रामीण साठी गरजेनुसार पोलीस कर्मचारी नियुक केलेले आहेत. 1 मे पासून नूतन पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे सुरू होणार असल्यामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील पोलीस बळ चांगलेच मजबूत झाल्याचे दिसत आहे.