Sat, Jul 20, 2019 02:11होमपेज › Solapur › मुंबईच्या शिवसैनिकाचा पंढरपुरात संशयास्पद मृत्यू

मुंबईच्या शिवसैनिकाचा पंढरपुरात संशयास्पद मृत्यू

Published On: Sep 06 2018 1:43AM | Last Updated: Sep 05 2018 10:33PMपंढरपूर : प्रतिनिधी

नवी मुंबईच्या मानखुर्दमधील शिवसैनिक अनिल विश्‍वास जाधव यांचा मृतदेह पंढरपूरच्या गोपाळपूर रोडवरील कचरा डेपोजवळ असलेल्या विहिरीत  आढळून आला. पोलिस सूत्रांच्या मतानुसार ही आत्महत्या असल्याचे सांगितले. मात्र,  यासंदर्भात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. 

दरम्यान, घटनास्थळी एक पिशवी सापडली असून त्यामध्ये शिवसैनिक असलेले ओळखपत्र  फोटो व अन्य कागदपत्रे आहेत. पोलिसांनी मुंबई येथे मयताच्या नातेवाईकांशी संपर्क 
साधून माहिती दिली आहे. 

बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास गोपाळपूर रोडकडील कचरा डेपोजवळच्या विहीरीत जाधव यांचा मृतदेह आढळून आला. मयताच्या जवळ ओळखपत्र सापडले असून त्यानुसार मंडाली तीस फुटी रोड, जिजामाता नगर, मानखुर्द, नवी मुंबई असा पत्ता मिळून आला आहे.   त्यावरून पोलीसांनी मयताच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आहे. दरम्यान ही विहीर अत्यंत आडचणीत असून सभोवताली उसाची शेती आहे. त्यामुळे अशा अडचणीतील विहीरीत अनिल जाधव कसे काय आले असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. उसाच्या शेतात काही महिला शेतीच्या कामात व्यस्त आसताना विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज झाला त्यानंतर ही घटना समजली. पोलिसांनी या घटनेचा तपास आत्महत्या समजून सुरू केला आहे. मयताच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून बुधवारी रात्री या घटनेची नोंद करण्याची कार्यवाई सुरू होती. पंढरपूर शहरचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे हे तपास करीत आहेत.