होमपेज › Solapur › भोसले यांना आर.सी.एफ.चा प्रगतशील किसान पुरस्कार

भोसले यांना आर.सी.एफ.चा प्रगतशील किसान पुरस्कार

Published On: Jan 31 2018 2:07AM | Last Updated: Jan 30 2018 9:13PMपंढरपूर : प्रतिनिधी

    केंद्र सरकारच्या राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्सचा (आरसीएफ)  मानाचा प्रगतशील किसान हा पुरस्कार सरकोली (ता.पंढरपूर) येथील शेतकरी डाळिंबरत्न दत्तात्रय साहेबराव भोसले यांना मिळाला.   प्रजासत्ताकदिनी मुंबई येथे या  पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

देशभरातील प्रत्येक राज्यातून पाच शेतकर्‍याची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. दत्तात्रय भोसले यांनी केलेल्या डाळिंब युरोप निर्यातीची व शेतकर्‍यांना वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आर.सी.एफ.चे सी.एम.डी. उमेश धात्रक यांच्याहस्ते व एच.आर.ई.डी. अरुण नवले व डी.जी.एम. शरद सोनावणे यांचे पस्थितीत प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास विविध राज्यातून बहुसंख्येने शेतकरी हजर होते. पुरस्कार मिळाल्यानंतर  बोलताना भोसले  म्हणाले की,शेतीव्यवसायात खूप आव्हाने आहेत, परंतु न खचता सातत्याने प्रयत्नशील राहिल्यास आपण यशस्वी शेती करू शकतो.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी खूपच फायदेशीर असल्याचे सांगून भोसले यांनी भारत सरकार व आरसीएफचे आभार आभार मानले.पुरस्कारानंतर विविध स्तरांतून भोसले यांचे अभिनंदन केले जात आहे.