Wed, Nov 13, 2019 12:51होमपेज › Solapur › पंढरपूर शहर व तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात 

पंढरपूर शहर व तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात 

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 10:35PMपंढरपूर : प्रतिनिधी 

देशाचा 72 वा स्वातंत्र्य दिन पंढरपूर शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये, ग्रामपंचायती आणि खासगी ठिकाणीही स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. 

स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा  शासकीय कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी आ. भारत भालके, पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील,  तहसिलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी आर.एस.घोडके, नायब तहसीलदार एस. पी. तिटकारे, महसुल नायब तहसीलदार सीमा सोनवणे, परि. नायब तहसीलदार विकास राणे, वनपरिक्षेत्र अधिकारी विलास पवळे, पंचायत समिती सदस्य प्रशांत देशमुख, नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, शकुंतला नडगिरे,यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिस पथकाच्या वतीने  मानवंदना देण्यात आली. 

पंढरपूर नगरपालिका पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारतीय स्वतंत्र्याच्या 72 व्या स्वातंत्र दिनानिमित्त नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते,  उपनगराध्यक्ष विशाल मलपे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला.

यावेळी गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पाणीपुरवठा सभापती सुप्रिया डांगे, महिला व बालकल्याण सभापती रेणुका घोडके, नगरसेविका करुणा आंबरे, श्‍वेता डोंबे, शकुंतला नडगिरे, नगरसेवक विक्रम शिरसट, प्रशांत शिंदे, डी. राज सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते निलेश आंबरे, सचिन डांगे, धर्मराज घोडके, नवनाथ रानगट, तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ध्वजनी म्हणून उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी काम पाहिले.

विवेक वर्धिनी विद्यालय विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर येथे ध्वजारोहनाचा  कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्राचार्य कैलास खुळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव अ‍ॅड. वैभव टोमके, ज्येष्ठ  संचालक मुकुंद देवधर, उपमुख्याध्यापक शिवाजी भोसले, पर्यवेक्षक राजेंद्र पाराध्ये सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ङ्ग72 वा स्वातंत्र्य दिनफ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. अशोकराव भोईटे  यांच्या हस्ते ध्वजपूजा, ध्वजारोहण करून ध्वजास वंदन करण्यात आले.  महाविद्यालायतील राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थ्यांनी परेड सदर करून ध्वजास वंदन केले. प्राचार्य व राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन डॉ.अशोक कोडलकर  यांनी राष्ट्रीय छात्र सेनेचे निरीक्षण केले.  

कला विभागाचे  उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, वाणिज्य विभागाचे एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विकास कदम,   क्रीडा शिक्षक डॉ. नितीन  सोहनी,कार्यालयीन प्रमुख श्री. शिवाजी लोभे  माजी सेवक  उपस्थित होते. 

सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंखेने सहभागी झाले होते.