Tue, Jul 23, 2019 04:22होमपेज › Solapur › भंडीशेगाव येथे तिहेरी अपघातात एक ठार

भंडीशेगाव येथे तिहेरी अपघातात एक ठार

Published On: May 16 2018 10:15PM | Last Updated: May 16 2018 10:07PMपंढरपूर : प्रतिनिधी

पुणे- पंढरपूर रोडवर भंडीशेगाव (ता.पंढरपूर )येथील कोळ्याचा मळा येथे बुधवार सकाळी भरधाव वेगाने अवैध प्रवाशी वाहतूक करणार्‍या मॅक्स जीपचा टायर फुटून झालेल्या तिहेरी अपघात एक जण ठार तर 8 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. नरेंद्र विनायक धाइर्ंजे (वय 52 ) रा. वेळापूर असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती  अशी की, अवैध प्रवाशी वाहतूक करणारी मॅक्स जीप ही बोरगावहून पंढरपूरच्या दिशेने येत होती. भंडीशेगाव ता.पंढरपूूर येथील  कोळ्याचा मळा येथे जीप आल्यानंतर जीपचा पुढील टायर फुटला. 

टायर फुटल्याने चालकाला जीपवर नियंत्रण  मिळवता न आल्याने पंढरपूरहून वेळापूरकडे  जाणार्‍या छोट्या हत्तीवर जाऊन जोरात आदळली. तर छोटा हत्तीच्या मागून येणारी दुचाकी छोटा हत्तीच्या खाली घुसली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. टायर फुटलेल्या  छोट्या हत्तीला जीपची जोराची धडक बसल्याने छोटा हत्तीमधून प्रवास करणारे  नरेंद्र विनायक धाइंजे (वेळापूर) यांना जबर मार बसल्याने ते जागीच ठार झाले. तर  जीप व दुचाकीवरील मिळून 8 जण जखमी झाले आहेत. जखमींना अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा अधिक तपास पंढरपूर ग्रामीण पोलिस करीत आहेत.

दरम्यान, अपघातात ठार झालेले नरेंद्र धाइर्ंजे यांचे अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून संध्याकाळी वेळापूर येथे शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.