Fri, Feb 22, 2019 09:32होमपेज › Solapur ›  शिक्षणाचा खर्च वडिलांना पेलवत नाही म्‍हणुन मुलीची आत्महत्या

 शिक्षणाचा खर्च वडिलांना पेलवत नाही म्‍हणुन मुलीची आत्महत्या

Published On: Jun 23 2018 9:39PM | Last Updated: Jun 23 2018 9:39PMपंढरपूर : प्रतिनिधी 

आपल्या आणि दोन्ही भावांच्या शिक्षणाचा खर्च अत्यल्प भूधारक वडिलांना पेलवत नाही. त्‍यांच्यावर आपल्‍या शिक्षणाचा बोजा पडत आहे. यामुळे त्यांची ओढाताण असह्य झाल्याने इलेक्ट्रॉनिक  अभियांत्रिकी चे शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ईश्वर वठार ( ता. पंढरपूर )  येथील शेतकऱ्याच्या मुलीची ही वेदनादायक घटना आहे.

ईश्वर वठार येथील हणमंत काशीनाथ लवटे यांची मुलगी अनिशा ( वय 17 ) ही तासगाव येथे पॉलिटेक्निकलच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. तिच्या व दोन भावंडांचा शिक्षणाचा खर्च करताना वडिलांची ओढाताण होत आहे. म्हणून तिने राहत्या घरी आज ( शनिवारी ) पंख्याला  साडीने बांधून  आत्महत्या केली. 

अनिशाच्या वडिलांना 1 एकर जमीन  असून, त्यांना दोन मुली व एक मुलगा अशी अपत्ये आहेत. अनिशा ही दोन नंबरची मुलगी, ती पॉलिटेक्निकल कॉलेज तासगाव येथे डिप्लोमा इन  इलेक्ट्रॉनिक ला द्वितीय वर्षाला होती. आपला शिक्षणाचा वाढता खर्च करताना वडिलांची होणारी ओढाताण ही अनिशा ला बघवत नव्हती. आपल्‍या वडीलांची होणारी ओढाताण थांबावी. म्हणून तीने मृत्यूला जवळ केले. आपण  गेल्यावर  आपल्या बहिण भाऊ यांना  तरी वडील चांगले शिक्षण देतील. अशा आशयाची चिट्ठी मृत्यूपूर्वी अनिशा ने लिहिली असून, यामध्ये आपल्या शिक्षणाचा खर्च वडील करू शकत नाहीत, असा उल्लेख केला आहे.अनिशाच्या मृत्यूचे वृत्त समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.