Tue, Sep 17, 2019 22:03



होमपेज › Solapur › उस्मानाबादेत प्रांताधिकार्‍याचा दुचाकी अपघातात मृत्यू

उस्मानाबादेत प्रांताधिकार्‍याचा दुचाकी अपघातात मृत्यू

Published On: Dec 20 2017 1:47AM | Last Updated: Dec 19 2017 11:13PM

बुकमार्क करा





उस्मानाबाद : प्रतिनिधी 

प्रशिक्षणासाठी दुचाकीवरून निघालेल्या  शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या तरुण प्रांताधिकार्‍याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. तुळजापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. 
डॉ. चंद्रकांत तुकाराम भाळे (वय 28, रा. पिलीव, ता. माळशिरस) असे मृत प्रांताधिकार्‍याचे नाव आहे. डॉ. भाळे हे शेळी व मेंढी विकास महामंडळात प्रांताधिकारी होते. मंगळवारी पहाटे तुळजापूरच्या दिशेने उस्मानाबाद शहराकडे ते दुचाकीवरून (एमएच 45 एजी 119) येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाला.