Fri, Jul 19, 2019 22:42होमपेज › Solapur › ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 9:49PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

शाळार्थ वेतनासह ऑनलाईन कामांवर  संपूर्ण बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला. 

शिक्षकांना शिक्षकी पेशा सोडून केवळ ऑनलाईनची कामे करण्यातच वेळ जात असल्याने सर्वच शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी एकत्रित येऊन या कामावर बहिष्कार टाकला होता. यासाठी 18 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोरही धरणे आंदोलन करण्यात आले होते. 

शिक्षकांनी ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकल्याने शिक्षकांची शालार्थ वेतन प्रणाली संगणकीय प्रणालीने मुख्याध्यपकांना सादर करण्यास सांगण्यात येत आहे. अन्य कामांवर मात्र, बहिष्कार टाकण्यात यावा, अशी चर्चा होताना दिसत होती. त्यामुळे शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांनी पुन्हा बैठक घेत सर्वच कामांवर बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. 

शिक्षकांचे वेतन करण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी यांची आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकार्‍यांनी शिक्षकांचे वेतन करावे यासाठी अन्य यंत्रणा तैनात करावी, मुख्याध्यापक याकरता सहकार्य करणार नाहीत, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

या बैठकीस शिक्षक संघटनांचे पदाधिकारी शिवानंद भरले, अनिल कादे, मच्छिंद्रनाथ मोरे, सुधीर कांबळे, इकबाल नदाफ, बाबासाो ढगे, अरुण नागणे, नवनाथ धांडोरे, राजाराम चव्हाण, सूर्यकांत हत्तुरे, अमोगसिध्द कोळी, बब्रुवान काशिद, तानाजी बाबर, संजय नन्नवरे, अण्णासाो मगर, तातोबा कांबळे, योगेश कडासकर, प्रमोद कुसेकर आदी उपस्थित होते.