Wed, Feb 26, 2020 08:26होमपेज › Solapur › ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 29 2017 10:33PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

ईबाय या कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून दोन महिलांनी क्रेडिट कार्डचा ओटीपी नंबर विचारून  तरुणाच्या बँक खात्यातून 24 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत व्यंकटेश दत्तात्रय बुरा (वय 38, रा. न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन पूर्वी मिश्रा व प्रिया जैस्वाल यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यंकटेश बुरा यांच्या मोबाईल नंबरवरुन पूर्वी मिश्रा व प्रिया जैस्वाल या दोघींनी फोन करुन बुरा यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून अ‍ॅक्सिस बँकेच्या के्रडिट कार्डचा ओटीपी नंबर विचारुन त्यांच्या खात्यातून 24 हजार रुपये काढून फसवणूक केली म्हणून जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

आपटेंच्या दुकानातून 61 हजारांचा सोन्याचा ऐवज लंपास

मंगळवार पेठेतील सराफ बाजारातील आपटे यांच्या दुकानातून तिघांनी   मिळून 61 हजार 500 रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. याबाबत भाग्यश्री प्रशांत आगरखेड (पंडित) (वय 27, रा. मंत्री चंडक एलआयजी कॉलनी, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाग्यश्री आगरखेड या मेसर्स गणेश रामचंद्र आपटे यांच्या सोन्याच्या दुकानात कामास आहेत. मंगळवारी सायंकाळी आलेली एक महिला व दोन पुरुषांनी सोन्याचे दागिने दाखविण्याचा बहाणा करुन आगरखेड यांची नजर चुकवून 61 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलिस नाईक मुजावर तपास करीत आहेत.