Sun, Aug 18, 2019 21:03होमपेज › Solapur › सोलापूर : वाहनाच्या धडकेत बँक अधिकार्‍याचा मृत्यू

सोलापूर : वाहनाच्या धडकेत बँक अधिकार्‍याचा मृत्यू

Published On: Jan 21 2018 2:24PM | Last Updated: Jan 21 2018 2:24PMसोलापूर : प्रतिनिधी

अज्ञात वाहनाच्या धडकेत युनियन बँक ऑफ इंडिया मोहोळ शाखेचे अधिकारी अजित आनंदराव पाटील (वय 35, रा. ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद सोलापूर येथील शाससकीय रुग्णालयात झाली आहे.

अजित आनंदराव पाटील हे रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आपल्या चारचाकी वाहनामधून सोलापूर ते मोहोळ या महामार्गावरुन जात होते. सोलापूर विद्यापीठाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने त्यांच्या डोक्यास व पोटास जबर मार लागला होता.

अपघातानंतर सुमारे अर्धा तास जवळ कोणीच ओळखीचे नसल्याने मोठा रक्तस्त्राव झाला व वेळेवर उपचार मिळाले नाहीत. फौजदार चावडी पोलिस ठाणे येथील पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी रक्तबंबाळ झालेल्या अजित पाटीलला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु मोठा रक्तस्त्राव झाल्याने अजित पाटील यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. डॉक्टारांनी उपचार सुरु होण्यापूर्वीच मृत झाले असल्याचे घोषित केले.