Thu, May 23, 2019 15:01
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › खवणी येथे वृद्धाची आत्महत्या

खवणी येथे वृद्धाची आत्महत्या

Published On: Aug 04 2018 7:54PM | Last Updated: Aug 04 2018 7:09PMमोहोळ : वार्ताहर

अज्ञात कारणाने एका ६५ वर्षीय वृद्धाने धोतराच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भीष्माचार्य दादाराव कोठाळे (रा. बाहुला ता. कळंब जि. उस्मानाबाद) असे या वृध्दाचे नाव आहे. ही घटना आज शनिवारी (४ ऑगस्ट) मोहोळ तालुक्यातील खवणी गावच्या शिवारात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, भीष्माचार्य कोठाळे आणि त्यांची पत्नी राजाबाई हे मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या काही वर्षांपूर्वी ते खवणी येथे मोलमजुरीची कामे करत होते. आज शनिवारी (४ ऑगस्ट) भीष्माचार्य हे शौचास जातो म्हणून बाहेर गेले होते. बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत. काही वेळानंतर त्यांच्या पत्नीने शोधाशोध केली. त्यावेळी खवणी येथील शेतातील लिंबाच्या झाडाला त्यांनी धोतराच्या साह्याने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. 

घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला आहे. 

घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीसांनी पंचनामा करुन मृतदेह तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. त्यांच्या मृत्यु नेमका कशामुळे झाला आहे याचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाला नंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास हवालदार रविंद्र चव्हाण हे करीत आहेत.