Wed, Jul 17, 2019 20:30



होमपेज › Solapur › अकलूज जुन्या बसस्थानकाच्या जागेत होणार व्यापारी संकुल

अकलूज जुन्या बसस्थानकाच्या जागेत होणार व्यापारी संकुल

Published On: Jul 24 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 7:06PM



अकलूज : वार्ताहर

येथील जुन्या बसस्थानक आवाराची पाहणी केल्यानंतर लवकरच या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचे काम सुरू करणार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.

पंढरपुरात आषाढी वारीनिमित्त शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरासाठी ते जात असताना ते शनिवारी रात्री अकलूजला थांबले होते. त्यावेळी शिवसेनेच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. रात्री उशिरा येथील संगम येथील गणेश इंगळे या शिवसैनिकांच्या अकलूज येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.या जुन्या बस स्थानकाच्या जागेत व्यापारी संकुल उभारावे अशी मागणी डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी अनेकवेळा करून त्याचा पाठपुरावा केला होता.

त्या पार्श्‍वभूमीवर परिवहन मंत्री रावते यांनी  रविवारी सकाळी त्यांनी या जुन्या बसस्थानकाला भेट देऊन पाहणी केली.  या ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्यास हरकत नसल्याचे सांगत लवकरच या ठिकाणी बांधकामास सुरुवात करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ.धवलसिंह मोहिते -पाटील, जिल्हा उपप्रमुख दत्ता पवार, तालुका प्रमुख नामदेव वाघमारे, अण्णासाहेब इनामदार, सतीश पालकर, ज्योती कुंभार, जुल्कर शेख आदी उपस्थित होते.

आरटीओ ऑफिसचे उद्घाटन काँग्रेस-राष्ट्रवादीने करावे

येथे झालेले आरटीओ ऑफिस अद्याप उद्घाटनाचे प्रतीक्षेत असल्याचे मंत्री रावते यांच्या लक्षात आणून देताच ते काम काँग्रेस राष्ट्रवादीने केले आहे. त्यांनीच उद्घाटन करावे.असे रावते यांनी सांगितले.