होमपेज › Solapur › जुन्या अकलूज रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

जुन्या अकलूज रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Published On: Jul 12 2018 10:35PM | Last Updated: Jul 12 2018 9:39PMशेळवे : संभाजी वाघुले

 शेळवे (ता.पंढरपूर) परिसरातून गेलेला आणि यात्रा काळात रहदारीस महत्त्वपूर्ण ठरणारा जूना अकलूज रस्ता  गेली अनेक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. एक -दोन किमीचे डांबरीकरण सोडले तर अनेक ठिकाणी रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत आहे.

शेळवे परिसरातील याच जून्या अकलूज रस्त्यावरुन आषाढी वारीची निम्याहुन जास्त वाहनाची वाहतूक होत असते तरीही या रस्त्याची अवस्था दयनीय आहे. प्रत्येक आषाढी वारी अगोदर फक्त डागडुजी केली जाते, नंतर आषाढी वारी झाली की या रस्त्याची अवस्था जशीच्या तशीच असते.

प्रत्येक 15 दिवसाच्या एकादशीला व महिन्याच्या एकादशीला याच जुन्या अकलूज रस्त्यावरुन  वारकरी पंढरपूरला वारीला पायी व वाहनाने प्रवास करतात .गेली कित्येक वर्षापासून या खडतर रस्त्यावरुनच विठ्ठल भक्तासह प्रवाशांना ये जा करावी लागत आहे.

या जुन्या अकलूज रस्त्यावरुन शिरढोणचा काही भाग   खेडभाळवणी, शेळवे, पिराची कुरोली, वाडीकुरोली,  पटवर्धन कुरोली, आवे अशा अनेक गावांची दररोज वाहतूक या रस्त्यावरूनच होत आहे. या रस्त्यावरील खेडभाळवणी चौकापासून  पंढरपुराकडील रस्त्याची तर फार दयनीय अवस्था झालेली आहे. फक्त डागडुजी न करता पक्के रस्ते बनवण्याची मागणी शेळवेसह परिसरातील नागरिकांतून वारंवार केली जात आहे. हा जुना अकलूज रस्ता वाहतुकीस योग्य झाल्यास  वारकर्‍यांसह या परिसरातील व्यापारी  प्रवाशी शालेय  मुलांसह सर्वांनाच याचा फायदा होणार आहे.