Wed, Jun 26, 2019 18:21होमपेज › Solapur › मराठा समाजाचे ऐक्य नव्या क्रांतीची सुरूवात : प्रा.खेडेकर

मराठा समाजाचे ऐक्य नव्या क्रांतीची सुरूवात : प्रा.खेडेकर

Published On: Aug 07 2018 1:02AM | Last Updated: Aug 06 2018 10:04PMपंढरपूर : प्रतिनिधी

स्वराज्य मिळवणे असो, ते टिकवणे असो, राजकीय सत्ता असो की शिक्षण सर्वच क्षेत्रात मराठा समाजाला संघर्ष करावा लागला आहे. संघर्ष म्हणजेच मराठा आहे अशा मराठा समाजाला आज आपल्या हक्‍कासाठी रस्त्यावर उतरावे लागते आहे.  आरक्षण हा मराठा समाजाचा अधिकार आहे. मात्र खोट्या प्रतिष्ठेसाठी मराठ्यांनी मागच्या काळात आरक्षण नाकारल्याचे प्रतिपादन पा. यशपाल खेडेकर यांनी केले. येथील तहसील कार्यालयासमोर सूरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलन प्रसंगी प्रा. खेडेकर बोलेत होते. यावेळी भोसे जि.प.गटातील शेकडो आंदोलक उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना प्रा. खेडेकर म्हणाले की, मराठा समाज हा लढवय्या आहे, संघर्ष त्याच्या अंगभूत गुणांमध्ये आहे. आजवर मराठा समाजाचे सर्व जाती, धर्माला सोबत घेऊन पुढे जाण्याची भुमिका घेतली. मराठा समाज कायम उपेक्षितांना देत आला आहे. पुरोगामी विचार घेऊन अंधश्रद्धा आणि टाकाऊ विचार मागे ठेवून मराठा समाज सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पुढे जात राहिला.  म्हणूनच आज मराठा समाज आपल्या हक्‍कासाठी लढत असताना सर्वच समाज घटक मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसून येते. पूर्वीच्या काळी मराठा समाज जमीनदार होता. वतनदार होता मात्र आता वतने गेली आणि दारेही जायची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षात मराठा नेतृत्वाला जाणीवपूर्वक बदनाम करण्यात आले आहे. मराठा समाज संख्येने जास्त असूनही शांततेत मोर्चे काढले. मराठा समाजामध्ये प्रचंड नेतृत्व क्षमता असून प्रत्येक आंदोलक स्वत: एक नेता आहे त्यामुळे हे आंदोलन चालू आहे. आरक्षणाचा हक्क मिळवल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही. 

आज मराठा समाज केवळ आरक्षणासाठी एकत्र आलेला नाही तर पुढे होणार्‍या क्रांतीची ही सुरूवात आहे. आजही या आरक्षण आंदोलनापासून जे लांब आहेत त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करून प्रा. खेडेकर म्हणाल की, मराठा समाजाचं आंदोलन आता पेटून मशाल झाले आहे पुढे त्याचा वणवा झाला तर सरकारपुढे काहीच पर्याय राहणार नाही. सरकारला आरक्षण द्यावेच लागेल असाही दावा प्रा. खेडेकर यांनी केली.