नर्सने कापला 5 दिवसांच्या मुलीचा अंगठा

Last Updated: Oct 18 2019 7:56PM
Responsive image
संग्रहीत छायाचित्र

Responsive image

सोलापूर : प्रतिनिधी

सिव्हिल हॉस्पिटलमधील गायनॅक विभागात दाखल करण्यात आलेल्या 5 दिवसांच्या मुलीच्या डाव्या हाताची चिकटपट्टी काढताना नर्सने त्या बालिकेचा अंगठा कापला. यावेळी घटना लक्षात येताच ती नर्स  बालिकेला तसेच टाकून  पळून गेली.  

दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे राहणारे रिजवान नसरूद्दीन इटकळे यांनी त्यांची पत्नी मुस्कानला प्रसूतीसाठी डफरीनच्या हॉस्पिटलमध्ये 13 ऑक्टोबर रोजी दाखल केले होते. मुस्कानला मुलगी झाली. पण त्या बाळाच्या पोटात पाणी गेल्याने त्याच दिवशी शासकीय रूग्णालयातील गायनॅक विभागात दाखल करण्यात आले. 17 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास गायनॅक विभागातील एका नर्सने दुसर्‍या परिचारिकेसोबत गप्पा मारत मारत बाळाच्या हाताला लावलेली चिकटपट्टी कात्रीने काढण्याचा प्रयत्न केला. 

लक्ष नसल्याने नर्सने चक्‍क त्या बाळाचा अंगठाच कापला. त्यावेळी बाळाची आई त्या नर्सला बाळाच्या हातातून रक्त येत असल्याचे सांगत होती. परंतु, त्या नर्सने तुला जास्त समजते का मला, असे उर्मटपणे उत्तर दिले. पण, जेव्हा गप्पा मारणारी दुसरी नर्स गेल्यावर त्या नर्सचे लक्ष त्या बाळाकडे गेले असता चिकटपट्टी कापल्यानंतर त्या बालिकेचा अंगठा खाली पडलेला दिसून  आला. हे लक्षात येताच ती नर्स त्या बालिकेला तशाच परिस्थितीत सोडून तेथून पळून गेली. 

याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे, अशी माहिती त्या 5 दिवसांच्या बालिकेचे वडील रिजवान नसरूद्दीन इटकळे यांनी दिली.

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले


केरळात मुसळधार! ९ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून 'येलो अलर्ट'


कोरोना रुग्णांना मोफत उपचार द्या, हायकोर्टात याचिका


राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जूनला मतदान


कोल्हापूर : भुदरगड तालुक्‍यात मुसळधार पाऊस


सातारा : करकंबच्या कोरोनाबाधित व्यक्तीचा बार्डीतील सासरा पॉझिटिव्ह


आत्मनिर्भर पॅकेजमधील अनेक निर्णयांवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब


'आयसीएमआर'च्या मुख्यालयात आलेल्या ‘त्या’ वैज्ञानिकाला कोरोना!


कल्याणात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार केली अनोखी रिक्षा


५ जून ते ५ जुलै एकाच महिन्यात तीन ग्रहणाचा योग!