Wed, Jan 23, 2019 03:19होमपेज › Solapur › निरा उजवा कालव्यास आजपासून उन्हाळी हंगामाचे आवर्तन सोडणार

निरा उजवा कालव्यास आजपासून उन्हाळी हंगामाचे आवर्तन सोडणार

Published On: Mar 12 2018 9:27PM | Last Updated: Mar 12 2018 9:27PMबोंडले : विजयकुमार देशमुख. 

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शेतकर्‍यांचे लक्ष निरा उजवा कालव्यास उन्हाळी हंगामाचे सिंचनासाठी आवर्तन कधी परतून सुटणार आणि कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लागलेले होते.

निरा उजवा कालव्यातून सिंचनासाठी उन्हाळी हंगामाचे आवर्तन सोडण्यासाठी मुंबई येथे कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत निरा उजवा कालव्यास आजपासून सिंचनासाठी उन्हाळी हंगामाचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सध्या एकूण थकीत पाणीपट्टीच्या ७ टक्के पाणीपट्टी वसूल झालेली असून उर्वरीत पाणीपट्टी वसुल करण्याची जबाबदारी संबंधित साखर कारखाने व पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतलेली आहे. जर का पाणीपट्टी वसूल झाली नाही तर संबंधित थकबाकी असलेली वितरीका सिंचनासाठी सोडले जाणार नाही असा निर्णय बैठकीत घेण्यात आलेला आहे.

यावेळी याबैठकीस जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष रामराजे निंबाळकर, आ.गणपतराव देशमुख, आ. दीपक चव्हाण, आ. हणमंतराव डोळस, दिपकआबा साळुंखे, महामंडळाचे कार्यकारी संचालक घोटे, मुख्य अभियंता मुंडे, अधिक्षक अभियंता चोपडे, नीरा उजवा कालवा, विभाग फलटणचे कार्यकारी अभियंता सिध्दमल, फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सावंत, माळशिरसचे उपविभागीय अधिकारी सरवदे, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी ठवरे तसेच पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.