Tue, Jun 25, 2019 14:06होमपेज › Solapur › वृत्तपत्र विक्रेता संघटनेची निदर्शने 

वृत्तपत्र विक्रेता संघटनेची निदर्शने 

Published On: Dec 05 2017 6:52PM | Last Updated: Dec 05 2017 6:58PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर व जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाच्यावतीने विविध मागण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

स्वतंत्र्य वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, गटई कामगाराप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्द करून दयावी, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यासाठी राखीव कोटा ठेवावा, एस.टी. प्रवासासाठी राज्य संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यांना मोफत सेवा मिळावी, शासकीय विश्रामगृह राज्य संघटनेच्या लेटर हेडवर बैठकीस सवलतीच्या दरात मिळावे, विधान परिषदेवर असंघटीत कामागारांचा प्रतिनिधी घेण्यात यावा. अशा मागण्यांसाठी सोलापूर शहर व जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. व मागण्याचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी गोरख भिलारे, शिवलिगप्पा मेढेगार, अरूण भोरे, सचिन बाबर, अखिलेश कोरे, संतोष तोळणुरे, विजय मानकर, मल्लिकार्जुन कोरे तसेच शहर जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेता मोठया संख्येने उपस्थित होते.