Sun, May 19, 2019 22:42होमपेज › Solapur › पंढरपूर येथे बंधाऱ्याच्या पाण्यात नवजात अर्भक

पंढरपूर येथे बंधाऱ्याच्या पाण्यात नवजात अर्भक

Published On: Jul 08 2018 1:30PM | Last Updated: Jul 08 2018 1:29PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर येथील नवीन बांधऱ्याच्या पाण्यात पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे अर्भक कुणी टाकले असावे की वाहत आले आहे याविषयी तर्क लढवले जात आहेत. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येथील नवीन पुलाजवळ असलेल्या बंधाऱ्याच्या पाण्यावर एक अर्भक मृतावस्थेत तरंगताना दिसून आले. हे अर्भक सुमारे ८ दिवस वयाचे असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.  हे अर्भक कुणी टाकले असावे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान अर्भक आढळल्याचे समजताच शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.